Tuesday, April 27, 2010

पहिली मराठा इतिहास परिषद पुण्यात
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 28, 2010 AT 12:00 AM (IST)

सोलापूर - महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमी आयोजित पहिली मराठा इतिहास परिषद पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक भवन येथे 8 व 9 मेरोजी होणार असल्याचे इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी कळविले आहे.रघुनाथराजे निंबाळकर यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी इतिहास व धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा. अशोक राणा असणार आहेत. राहूल पोकळे स्वागताध्यक्ष आहेत. समारोप सत्राचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर असणार आहेत.आठ मेरोजी पहिल्या सत्रात शिवकाळाचे इतिहास लेखन : पध्दतीशास्त्र आणि सिध्दांत या विषयावर ऍड. अनंत दारवटकर, रोहिणी कोडितकर वक्‍ते बोलणार असून, प्रा. देवेंद्र इंगळे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या सत्रात शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह या विषयावर प्रा. डॉ. उमेश कदम, प्र्रा सचिन गरूड, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, कॉ. किशोर ढमाले बोलणार असून, डॉ. अनिल शिनगारे अध्यक्ष असणार आहेत. तिसऱ्या सत्रात शिव इतिहास व विविध माध्यमे : चित्रण या विषयावर गंगाधर बनबरे, मदन पाटील, इंद्रजित सावंत बोलणार असून, डॉ. शरणकुमार निंबाळे अध्यक्षस्थानी आहेत. चौथ्या सत्रात अभ्यासक्रमातील शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास या विषयावर प्रा. डॉ. उमेश बगाडे आणि कागल येथील शिवराज्य मंचचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजीमहाराज हे नाटक सादर करणार आहेत.9 मेरोजी सकाळच्या सत्रात शिवकर्तृत्वाचे विविध पैलू , शिवकाळाचे इतिहास लेखन : लेखकांचे योगदान या दोन विषयावर शोधनिबंध वाचन होणार आहे. दुसऱ्या सत्रात शिवकालीन इतिहास लेखनाबाबत संभाव्य दिशा दिग्दर्शन या विषयावर ऍड. गाझीयोद्दिन सय्यद, प्रा. डॉ. निरज साळुंखे, प्रा. डॉ. रामभाऊ मुटकुळे बोलणार असून, डॉ. पी.ए. गवळी अध्यक्षस्थानी आहेत. तिसऱ्या सत्रात शिवकालीन विस्थापितांचा इतिहास या विषयावर जयपाल चव्हाण, डॉ. एस.सी. गंगवार, डॉ. रोशनलाल गंगवार बोलणार आहेत. चौथ्या सत्रात इतिहास लेखकाकडून अपेक्षा या विषयावर राहूल पोकळे, रविंद्र माळवदकर बोलणार असून, प्रभाकर ढगे अध्यक्षस्थानी आहेत.समारोप सत्रात दिपक मानकर, चेतन तुपे, दिगंबर दुर्गाडे, अनिल जगताप उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राजाभाऊ पासलकर, दत्ता नलावडे, राम पायगुडे, प्रमोद मांडे यांचा विशेष सत्कार होणार आहे. सर्वांनी इतिहास परिषदेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. कोकाटे यांनी केले आहे


पुणे में पहली मराठा इतिहास परिषद
SATURDAY, 17 APRIL 2010 14:02
आगामी ८ व ९ मई को भव्य आयोजनरघुनाथ राजे निंबालकर करव्ंगे उद्घाटनपुरूषोत्तम खेडेकर की अध्यक्षता में परिषद का शानदार

-महात्मा द्गयोतिबा फुले इतिहास अकादमी की ओर से पहली मराठा इतिहास परिषद का आगामी ८ व ९ मई को पुणे में डॉ. बाबासाहब आंबेडकर सांस्कृतिक भवन में आयोजन किया गया है.दो दिवसीय परिषद का उद्घाटन पलटण के रघुनाथ राजे निंबालकर करव्ंगे. स्वागताध्यक्ष राहुल पोकले है. उद्घाटन सत्र इतिहास व धर्मशास्त्र के विद्वान अध्येता प्रा. अशोक राणा की अध्यक्षता में होगा. समापन सत्र की अध्यक्षता मराठा सेवा संघ के संस्थापक, अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर करव्ंगे.परिषद में शिवकालीन इतिहास लेखन, प्रणाली शास्त्र और सिध्दांत विषय पर ८ मई को एड. अनंत दाखटकर, रोहिणी कोडतकर, देवेन्द्र इंगले, तथा दूसरव् 'शिवकालीन इतिहास लेखन के विभिन्ना प्रवाह' विषय के चर्चा सत्र में प्रा. डॉ. उमेश कदम प्रा. सचिन गरूड, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, कॉ. किशोर उमाले, डॉ. अनिल शिंगारव्, तीसरव् सत्र में 'शिव इतिहास व विविध माध्यम' विषय पर गंगाधर बनबरव्, मदन पाटील, इंद्रजीत सावंत, डॉ. शरणकुमार लिंबाले, और चौथे सत्र में 'शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास' विषय पर प्रा. डॉ. उमेश बगाडे विचार व्यक्त करव्ंगे.९ मई को 'शिव कर्तुत्वाचे विविध पहलू' संदर्भ में मान्यवरों के शोध-प्रपत्रों का वाचन किया जायेगा.

Monday, December 28, 2009

शिवरायांना निरर्थक वादात अडकवून ठेवले जात आहे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, June 27th, 2009 AT 11:06 PM
पुणे - "छत्रपती शिवरायांच्या चरित्राचे अनेक पैलू समोर येऊ नयेत, म्हणून त्यांना निरर्थक वादात अडकवून ठेवण्यात येत असून, आपणही अस्मितेच्या विषयामुळे त्यावर प्रतिक्रिया देत आहोत. यापुढे अस्मिता जपतानाच शिवरायांच्या विविधांगी इतिहासाचा अभ्यास करणे, ही काळाची गरज आहे,'' असे मत इतिहासाचे अभ्यासक चंद्रशेखर शिखरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
राष्ट्रसेवा समूहातर्फे आयोजित "शिवस्मारक व शिवचरित्र वाद - इतिहासाचे सत्यशोधन की ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद' या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. वसंतराव मोरे, प्रवीण गायकवाड, गंगाधर बनबरे आणि राहुल पोकळे या वेळी उपस्थित होते. शिखरे म्हणाले, "आम्ही इतिहासातील घटनांचा अन्वयार्थ शोषितांच्या दृष्टिकोनातून लावणार आहोत, हा जातीयवाद नव्हे. चुकीचा इतिहास वाचल्यामुळे अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत. इतिहासाचे मापदंड तुम्ही ठरविणे बंद करावे. शिवभारत आणि जेधे शकावली या प्रमुख पुराव्यांमधील नोंदींनुसार दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू असल्याचा कोठेही उल्लेख नाही.''
या चर्चासत्रासाठी निनाद बेडेकर, गजानन मेहेंदळे आणि पांडुरंग बलकवडे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते; मात्र ते या वेळी उपस्थित नव्हते. त्याचा उल्लेख करून "तुम्ही समोरासमोर का येत नाही,' असा प्रश्‍न मोरे यांनी विचारला. बनबरे म्हणाले, ""आम्ही आमच्या विचारांनी संस्कृतीचे चित्र मांडू पाहतो, त्याला तुम्ही ब्राह्मणद्वेष म्हणत असाल, तर त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.'' जातीयवादाचा मुद्दा निर्माण करून शिवचरित्राविषयीचे पक्के पुरावे दृष्टिआड करण्याचे हे षड्‌यंत्र आहे, अशी टीका गायकवाड यांनी केली
मराठा साहित्याद्वारे इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे - श्रीमंत कोकाटे
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM
नागपूर - ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लेखकांनी आतापर्यंतचा इतिहास विकृतपणे मांडला आहे. तो इतिहास मराठा साहित्याच्या माध्यमातून पुनर्लिखित करीत नव्याने मांडावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
मराठा सेवा संघप्रणीत जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पाचव्या मराठा साहित्य संमेलनाच्या सत्रात "मराठा साहित्याची भूमिका' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते गंगाधर बनबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून "प्रतिइतिहास'कार इंजि. चंद्रशेखर शिखरे, मनपाचे विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुडधे-पाटील, भारतीय सेवा मंडळाचे राम आकरे उपस्थित होते. कोकाटे म्हणाले, "मराठी साहित्य हे केवळ पु. ल. देशपांडे, अत्रे व खांडेकरांचे साहित्य आहे. संत तुकारामाचे साहित्य हे मराठा साहित्य आहे. अलीकडे त्यात. मा. म. देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर, प्रा. अशोक राणा यांच्या साहित्याची भर पडली आहे. मराठा आणि ब्राह्मणी साहित्याची तुलना करताना ब्राह्मणी साहित्याने शिवाजी महाराजांचा संघर्ष धार्मिक संघर्ष म्हणून मांडला. मात्र, तो संघर्ष धार्मिक नसून राजकीय संघर्ष होता. याशिवाय संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न साहित्यात करण्यात आला. यातून पसरणारे विचार आपल्या मुलांना शिक्षणसत्ता आणि अर्थसत्तेपासून दूर ठेवण्याचे षड्‌यंत्र आहे. याविरुद्ध संघर्ष न केल्यास बहुजनांचे ब्राह्मणीकरण होईल.
मराठा साहित्यात समतेची व विश्‍वव्यापकतेची भूमिका आहे. ती भूमिका जगासमोर आणण्यासाठी इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहिण्याची गरज आहे. जो इतिहास विसरतो, तो इतिहास लिहू शकत नाही, तेव्हा आजच्या पिढीने तो विसरता कामा नये. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अधिकाअधिक संशोधनात्मक, ललित, नाटक, कादंबरी, कविता यासारख्या साहित्याची निर्मिती करीत तुकाराम महाराजांची प्रतिमा उदात्त करावी, असे आवाहन त्यांनी केले. बनबरे म्हणाले, "मराठा साहित्य हे एका जातीला प्रेरक असे साहित्य नाही. ते सर्वांना प्रेरक आहे. या तुलनेत मराठी साहित्य संकुचित स्वरूपाचे आहे. आज भाषेचा दहशतवाद डोक्‍यात पसरविण्यात येत असून, तो डोक्‍यात शिरू न देता नवे प्रश्‍न नव्या भूमिका ठेवा. आजही आम्ही प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा, अशी शाहू-फुलेंची मागणी करतो. हा त्यांचा विचारांचा पराभव आहे. यावेळी इंजि. चंद्रशेखर शिखरे यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन रजनी डहाके यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
..............

Friday, June 13, 2008

maratha history association


jai jijau
maratha history kaksha is a new wing of maratha seva sangh,this wing provides real maratha history about all maratha warriors, various re-searches , studies , projects , book publishing ,fort visits , museum visits , archeological studies ,oriental researches have been done by this "maratha itihas kaksha"
मराठयानी इतिहास तर घडविला पण तो जतन केला नाही...आणि महत्वाचं म्हणजे लिहिलाही नाही....म्हनुनच आजचा मराठा बहुजन समाज मृतवत बनला आहे,तो आपला उज्वल आणि दैदीप्यमान इतिहास विसरु लागला आहे...कारण मराठ्यांच्या ह्या तेजोमय इतिहासाला वाळवी लागली आहे ती इथल्या वैदिकशाहीची..."इतिहास विसरनारे कधीही इतिहास घडवू शकत नाहीत"..ह्याचा मोठा इतिहास आहे..म्हनुनच हा उज्वल आणि खरा इतिहास जपायचा आहे, मुळचा शिवधर्मी असलेला मराठा शंभूरायांचा आदर्श घेवून स्वतःचा लिहिण्यास सक्षम बनला आहे ... "एका हातात समशेर तर दुसरया हातात लेखनी" घेवून बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक, नखशिख सारखे ग्रंथ लिहनारे छत्रपति संभाजी राजे ह्यांच्या पावन स्मृतिना हा नवा उज्वल इतिहास अर्पण ...
"मराठ्यांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास" (खंड पहिला) प्रकाशन
डॉ.साहेबराव खंदारे यांनी आंतर विद्याशाखीय संशोधन पद्धतिचा वापर करून हा अमूल्य महा-ग्रंथ सिद्ध केला आहे,
मराठ्यांच्या इतिहासाचे आरंभपूर्व लिहिणारे ते एकमेव प्रभिवंत लेखक आहेत,असे दहा खंड प्रकाशित करण्याची शपथ त्यांनी घेतली आहे...ह्या ग्रंथाचे प्रकाशन परभणी येथे मोठ्या उत्साहात दि.२० जुलै २००८ रोजी केंद्रीय रा ज्यमंत्री सूर्यकांताताई पाटिल,पुरुषोत्तम खेडेकर,सहकार मंत्री जयप्रकाश दान्डगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेली अनेक मान्यवर उपस्थित होते...
मुळ किंमत-१००० रुपये,३० अगस्त २००८ पर्यंत ६०० रुपयात उपलब्ध ....
sampark-
राजमुद्रा प्रा.लि.परभणी लोकपीठ.६७,शिवराय नगर परभणी.फोन- ०२४५२-२२१७१५.
मराठामार्ग कार्यालय१-अ,हनुमान नगर,मेडिकल चौक नागपुर.